Other

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात

स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करत संविधानिक मूल्यांच्या जपणुकीचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात

स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करत संविधानिक मूल्यांच्या जपणुकीचा संकल्प

जळगाव, : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव जिल्हा व महानगरच्या वतीने ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. आकाशवाणी चौकातील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रदेश सरचिटणीस रविंद्रजी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन तसेच ध्वजारोहण स्तंभाचे पूजन जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी यांच्या हस्ते करण्यात आले. पक्ष कार्यालय परिसरात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. लाऊडस्पीकरवर देशभक्तीपर व भक्तिगीते सुरू असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक आणि वीर हुतात्म्यांना यावेळी अभिवादन करण्यात आले. त्याग, संघर्ष, शौर्य आणि देशप्रेमाच्या बळावर मिळालेले स्वातंत्र्य जपणे, संविधानिक मूल्यांचा सन्मान करणे आणि देशाच्या प्रगतीत योगदान देणे हीच स्वातंत्र्यसैनिकांना खरी आदरांजली ठरेल, असा संदेश यावेळी देण्यात आला.

भारताची एकता, अखंडता, सार्वभौमता आणि बंधुभाव अधिक दृढ व्हावा, तसेच देशाची प्रगती, समृद्धी आणि वैभव उंचावावे, यासाठी उपस्थितांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन यांनी केले. कार्यक्रमाला महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पिताताई पाटील, प्रदेश चिटणीस ईजाजभाई मलिक, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, सामाजिक न्याय उत्तर महाराष्ट्र प्रमुख रमेश बारे, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष सुरेश पगारे, प्रदेश सरचिटणीस जयप्रकाश चांगरे, समन्वयक विलास भाऊसाहेब पाटील, राजेश गोयल, माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे, माजी नगरसेवक सुनील भैय्या माळी, प्रा. अजित वाघ, प्रा. पवार, प्रा. जयप्रकाश महाडिक, सुहास चौधरी, रहीम तडवी, राहुल टोके, राजू बाविस्कर, बंडुभाऊ भोळे, सामाजिक न्याय महानगर कार्याध्यक्ष गोपाळराव पाचवणे, कार्यालय मंत्री सतीश चौव्हाण, शिक्षक आघाडीचे प्रवीण धनगर, भिस्ती सर, प्रवीण पाटील, शांताराम पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन यांनी मानले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button