अमळनेरमध्ये ‘जागतिक आदिवासी गौरव दिन’ मोठ्या उत्साहात; क्रांतीवीरांना अभिवादन करत शहरात निघाली भव्य मिरवणूक

अमळनेरमध्ये ‘जागतिक आदिवासी गौरव दिन’ मोठ्या उत्साहात; क्रांतीवीरांना अभिवादन करत शहरात निघाली भव्य मिरवणूक
अमळनेर (विशेष प्रतिनिधी):
जल-जंगल-जमिनीचे रक्षण करणारे आदिवासी समाजबांधव, त्यांची समृद्ध संस्कृती आणि क्रांतीवीरांच्या ऐतिहासिक बलिदानाचा वारसा जपणारा ‘जागतिक आदिवासी गौरव दिन’ ९ ऑगस्ट रोजी अमळनेर शहर व परिसरात अत्यंत उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. अमळनेर नगरपरिषद जवळील क्रांतिवीर समशेर सिंग पारधी स्मारकाजवळ विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व क्रां.समशेरसिंग पारधी चौकात अभिवादन
दिवसाची सुरुवात आदिवासी क्रांती दल संघटनेच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी करत मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. यानंतर क्रांतिवीर समशेर सिंग पारधी चौकात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून क्रांतीवीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
या प्रसंगी आदिवासी क्रांती दल संघटनेचे अध्यक्ष आप्पा दाभाडे, प्रविण बैसाणे, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, ॲड. ललिता श्याम पाटील, वसुंधरा लांडगे, नावेद शेख, कैलास पाटील, बाळासाहेब संदानशिव,पंकज चौधरी,माजी नगरसेवक संजय पवार,सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल मावळे,सलीम टोपी,विनोद मोरे, दयाराम मोरे, सुरेश भिल, राजेंद्र भिल, हरिश्चंद्र भिल, सुदाम वाघ, वसंत भिल, प्रभाकर पारधी, पराग पाटील, हिम्मत पारधी, सुरेश जमादार, बल्ली पवार, पूनमचंद चव्हाण, कलीम शेख,गणेश चव्हाण,ज्योतीबाई दाभाडे, उषाबाई भिल, हिराबाई पारधी, सुनीता मोरे, कल्याणी दाभाडे या प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य गौरव मिरवणूक
आदिवासी समन्वय समितीच्या वतीने ताडेपुरा भागात जननायक भगवान बिरसा मुंडा व वीर एकलव्य यांच्या प्रतिमांचे पूजन करून धरतीपूजन व धरतीगीताने गौरव मिरवणुकीचा प्रारंभ झाला. जयश्री पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी मिरवणुकीचे उद्घाटन केले.
पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, लोकनृत्ये आणि भगवान बिरसा मुंडा व तंट्यामामा भिल यांच्या रूपातील लहान मुलांच्या कलाविष्काराने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. ही मिरवणूक ताडेपुरा, चोपडा नाका, बोरी नदी पूल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, दगडी दरवाजा, तिरंगा चौक व बसस्थानक मार्गे महाराणा प्रताप चौकात पोहोचली.
सोहळ्यात नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर, माजी आमदार शिरीष चौधरी,रिता बाविस्कर,नगरसेवक अनिल महाजन, सभापती नाविद शेख, नाना धनगर, सखुबाई भिल,शोभाबाई गढरे,विजय पाटील, दुर्गेश पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी सहभागी झाले. खासदार स्मिता वाघ आणि आमदार अनिल पाटील यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. समन्वयक आनंद पवार आणि विकास पवार यांनी सर्वांचे आभार मानले.
या सोहळ्यात एरंडोल, पारोळा व पनवेल येथील मान्यवरांसह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. अजय पवार यांनी प्रास्ताविक तररणजित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. कलावंतांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विकास पवार, अजय पवार, धनराज मालचे, गुलाब बोरसे, आकाश भील, राहुल मोरे व इतर सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.






