Other

पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

जळगाव) – जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पाचोरा शहरातील सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. यामध्ये पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालयच्या नवीन इमारतीचे बांधकाम तसेच नगरपरिषद हद्दीतील नगररचना (टाऊन प्लॅनिंग) योजनांच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी त्यांनी उपविभागीय कृषी कार्यालयाच्या बांधकामस्थळी भेट देऊन सुरु असलेल्या कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. यावेळी कामाचा दर्जा राखून निर्धारित कालावधीत बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

त्यानंतर त्यांनी पाचोरा नगरपरिषद हद्दीतील गिरड रोडलगत साकारण्यात आलेल्या नगररचना (टाऊन प्लॅनिंग) भागाची पाहणी केली. या ठिकाणी सुमारे ९२ एकर क्षेत्रावर नगर रचना योजनेतंर्गत विकसित करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत ग्रीन झोनमधील जमिनींचा निवासी क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. या योजनेत १९ मूळ भूखंडधारकांना २२ अंतिम सुनियोजित प्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

नगरपरिषदेमार्फत केंद्र शासनाच्या योजनेतून प्रशस्त रस्ते, गटारी, पाणीपुरवठा जाळे, पथदिवे आदी मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच उद्यान, खेळाचे मैदान, अभ्यासिका आणि सिविक सेंटरसाठी आरक्षित जागा राखून त्यांचे संरक्षण करण्यात आले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही करण्यात आले असून पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे.

शहर विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या अशा योजनांमुळे नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. विकासकामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी यावेळी दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे, तहसिलदार विजय बनसोडे, न.पा मुख्याधिकारी मंगेश देवरे उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button