Other

आषाढी एकादशी निमित्त विवेकानंद प्रतिष्ठानचा भव्य दिंडी सोहळा; वारकरी संस्कृतीसोबत सामाजिक संदेशांचा जागर

आषाढी एकादशी निमित्त विवेकानंद प्रतिष्ठानचा भव्य दिंडी सोहळा; वारकरी संस्कृतीसोबत सामाजिक संदेशांचा जागर

चोपडा (प्रतिनिधी)- शहरातील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित सर्वच विभागात दि.२५ रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून शाळेच्या पहिल्या वर्षापासून आजपर्यंत प्रतिवर्षाप्रमाणे संस्कृती व परंपरा जपत यावर्षी देखील ‘ दिंडी सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी पोशाख ,मुलींनी घागरा ओढणी , नऊवारी साडी परिधान करून विठूनामाचा गजर करत संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध केला.पालखी सोहळ्याची सुरुवात सकाळी ठीक ७ वाजता गांधी चौकातून झाली.संस्थेचे विश्वस्त डॉक्टर अमित हरताळकर ,सौ ज्योत्स्ना हरताळकर ,मुख्याध्यापिका श्रीमती सरला नथ्थू शिंदे,पवन लाठी बालवाडी विभागाच्या प्रमुख सौ.रेवती दीक्षित व सौ.योगिता केंगे. प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा चित्ते,संजय सोनवणे.इंग्लिश मीडियम विभागाच्या प्रिन्सिपल भारती पंजाबी ,गौरी शुक्ल ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी.सी.पाटील यांच्या समवेत सर्व विभागातील शिक्षकवृंद यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले.तसेच विठ्ठलाची आरती म्हणत दिंडी सोहळ्याची सुरुवात झाली ‘ज्ञानबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ , जय जय राम कृष्ण हरी या जयघोषात दिंडीने मार्गक्रमण केले.बँण्ड व लेझीम पथक , टाळ वाजवणारा पथक यांच्यासह विविध संतांच्या वेशभूषा पारंपरिक वेशभूषा करून बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक व इंग्लिश मीडियम विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुलांनी पांढरा कुर्ता-धोती, डोक्यावर गांधी टोपी कपाळावर बुक्का-चंदन लावले होते, तर मुलींनी नऊवारी साड्या नेसून, डोक्यावर तुळशी वृंदावन व कलश घेतले होते. गांधी चौकात ,चिंच चौकात ,गुजराथी गल्ली चौकात विद्यार्थीनींनी सुंदर असा रिंगण सोहळा तयार केला. विद्यार्थ्यांनी हातात ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ आणि ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ प्लास्टिक मुक्त भारत अशा आशयाचे फलक धरून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.विद्यार्थ्यांना परंपरेनुसार खडीसाखरेचा प्रसाद व राजगिऱ्याचे लाडू प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंद व कर्मचारीवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.दिंडी सोहळा यशस्वीसंपन्न झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर ,उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल , सचिव ॲड. रवींद्र जैन ,सहसचिव डॉ. विनीत हरताळकर, विश्वस्त माजी मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button