Education

माध्यमिक विद्यालय दोधवदच्या विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

रोशनी बैसाणे प्रथम, प्रेरणा राजपूत द्वितीय; शाळेसह गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा

माध्यमिक विद्यालय दोधवदच्या विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

रोशनी बैसाणे प्रथम, प्रेरणा राजपूत द्वितीय; शाळेसह गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा

अमळनेर (दोधवद) | प्रतिनिधी : इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये माध्यमिक विद्यालय, दोधवदच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा तसेच गावाचा नावलौकिक उंचावला आहे. या परीक्षेत विद्यार्थिनी रोशनी विनोद बैसाणे हिने प्रथम क्रमांक, तर प्रेरणा हितेंद्र राजपूत हिने द्वितीय क्रमांक पटकावत उज्ज्वल यश मिळविले.

विद्यार्थिनींच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्षसयाजीराव वसंतराव कापडणेकर यांनी त्यांचे अभिनंदन करत भावी शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या यशामागे शाळेचे मुख्याध्यापकल. ना. पाटील यांचे मार्गदर्शन तसेच  योगेश चौधरी आणि अविनाश मोरे या मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली.

विद्यार्थिनींच्या यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले असून, या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button