Education

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

जळगाव, गोदावरी फाऊंडेशन संचलित, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संलग्न आणि नॅक मान्यताप्राप्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावच्या वतीने आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील रील्स स्पर्धेचे आयोजन ऑनलाइन झूम प्लॅटफॉर्मद्वारे करण्यात आले.
महिला प्रसूती व स्त्रीरोग परिचर्या विभाग आणि नर्सिंग स्कॉलर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेची संकल्पना‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ अशी होती.बालविवाहाचे दुष्परिणाम, मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व, स्त्री-पुरुष समानता आणि मुलींच्या हक्कांचे संरक्षण याविषयी समाजात जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. .स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी १,५०० रुपये, तर द्वितीय क्रमांकासाठी १,००० रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य प्रा. डॉ. विशाखा गणवीर अध्यक्षतेस्थानी तर त्यांच्या सोबत उपप्राचार्य प्रा. जॅकनिथ धाया सी. परीक्षक,सुरत येथील व्हायब्रंट नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य प्रा. डॉ. अलका ताजने यांनी परीक्षक म्हणून योगदान दिले नर्सिंग स्कॉलर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. बिनू जो, महिला प्रसूती व स्त्रीरोग परिचर्या विभागाच्या प्रमुख प्रा. मेनाओ देवी खुराईजम, प्रा. स्नेहल जांभूळकर, प्रा.कोलेट लोंढे (एम.एस्सी. ट्यूटर), प्रा. अहिंसा लोखंडे आणि प्रा.निकिता रामटेके यांनी एम.एस्सी. नर्सिंग प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने केले.या राष्ट्रीय स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपली सर्जनशीलता, संवादकौशल्य आणि सामाजिक बांधिलकी व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button