CrimeSocial

रेशन, पेन्शन योजनांसाठी तहसील कार्यालयावर शिवसेनेचे आंदोलन

रेशन, पेन्शन योजनांसाठी तहसील कार्यालयावर शिवसेनेचे आंदोलन

वंचित लाभार्थ्यांना तातडीने न्याय देण्याची मागणी; नायब तहसीलदारांना निवेदन

जळगाव | प्रतिनिधी

रेशन कार्डधारकांना धान्य वितरण सुरू करणे, नवीन रेशन कार्ड मंजूर करणे तसेच विविध सामाजिक सुरक्षा योजनांपासून वंचित लाभार्थ्यांना तातडीने लाभ देण्याच्या मागण्यांसाठी मंगळवारी (दि. ७ जुलै) जळगाव तहसील कार्यालयावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले.

प्रा. भाऊसाहेब सोनवणे (उपजिल्हाप्रमुख) आणि प्रमोदभाऊ घुगे (तालुकाप्रमुख) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात महिला-पुरुष लाभार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनात १२ अंकी (NPH) रेशन कार्ड तयार होऊनही अनेक महिन्यांपासून धान्य वितरण सुरू न झालेल्या लाभार्थ्यांना तातडीने धान्य देण्याची मागणी करण्यात आली. तसेच नवीन रेशन कार्ड, १२ अंकी रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग पेन्शन योजना आणि एकल व विधवा महिलांना विविध योजनांचा लाभ त्वरित देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी संबंधित कागदपत्रांसह आलेल्या लाभार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन जळगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार राहुल वाघ यांनी स्वीकारले.

आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख प्रमोदभाऊ घुगे, युवासेना तालुकाप्रमुख किरण पवार, भगवान धनगर, प्रभाकर कोळी, लोटन सोनवणे, एकनाथ सैंदाने, महेश अहिरे, खुशाल अहिरे, स्वप्नील राजपूत, प्रेमराज राठोड, योगेश पाटील, शरद सोनवणे, अरुण कोळी, योगेश घुगे, चंद्रकांत पाटील, योगेश चौधरी, डॉ. रमाकांत कदम, भीमराव पांडव यांच्यासह महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button