Social

माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी भुसावळ येथे ३० जून रोजी मेळावा

माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी भुसावळ येथे ३० जून रोजी मेळावा
जळगाव,  : जळगाव जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी तसेच अवलंबित यांच्या अडिअडचणी सोडविण्यासाठी ३० जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता स्टेशन हेडक्वार्टर, भुसावळ येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यास Army Placement Node, Pune, PCDA Allahabad, Records ARMD Corps, Records MAHAR Regiment, Records MIRC, Records The Maratha Light Infantry Regiment, EME Records, Records The Mech Infantry Regiment Signal Records, MEG Records, BEG Records, Arty Records यांसह CPPC स्टेट बँक ऑफ इंडिया, CPPC पंजाब नॅशनल बँक, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जळगाव व बुलडाणा येथील अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

तरी मेळाव्यात संबंधित माजी सैनिक, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी तसेच अवलंबित यांनी आपल्या अडिअडचणींचे निवेदन छायांकित तीन प्रतींसह घेऊन ३० जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता स्टेशन हेडक्वार्टर, भुसावळ येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button