Crime

एमआयडीसी पोलिसांनी केली अवघ्या 24 तासात दोन घरफोड्यांची उकल

एमआयडीसी पोलिसांनी केली अवघ्या 24 तासात दोन घरफोड्यांची उकल

विधीसंघर्ष बालकासह सराईत ताब्यात ; हजारोंचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव प्रतिनिधी

एमआयडीसी पोलिसांनी दोन घरफोड्यांची सीसीटीव्ही फुटेच्या आधारावरून उकल केली असून यात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यात एका विधी संघर्ष बालकाचा समावेश आहे. . त्यांच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, सुरेश हिराराम सोलंकी (रा. सावीत्रीनगर, जळगाव) हे कुटुंबासह राजस्थान येथे गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून 1.6 लाख रुपयांचे चांदीचे दागिने आणि 40 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. 25 फेब्रुवारी रोजी शेजाऱ्यांनी घर उघडे असल्याची माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

एमआयडीसी पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत 51 सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासात, सराईत गुन्हेगार विशाल मुरलीधर दाभाडे (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) आणि त्याचा साथीदार दिपक राजू पाटील (रा. तांबापूर, जळगाव) यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. विशाल दाभाडे मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथे लपल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांचे पथक तातडीने रवाना झाले. सायबर सेलच्या मदतीने आरोपीचा शोध घेत त्याला एका लॉजमधून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि साथीदार दिपक पाटील मुक्ताईनगर येथे पळून गेल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्यालाही अटक करून 1.15 लाख रुपयांचे चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली.
विशाल दाभाडे हा जळगाव शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत 12 घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे.

अल्पवयीन मुलाने केली दुसरी घरफोडी

22 फेब्रुवारी रोजी गणेशपुरी, मेहरुण येथे मोहसीन खान अजमल खान यांच्या घरातून 23,300 रुपये चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. एमआयडीसी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मास्टर कॉलनी परिसरातील एका विधीसंघर्ष बालकाने ही चोरी केल्याचे उघड केले. त्याच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

हि कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे यांच्या पथकाने हि कारवाई केली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button