Crime

पंढरपूर वारीसाठी नातेवाईकांना सोडून परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टरला गॅस टँकरची धडक; एक जण ठार, १५ जण जखमी

कजगावजवळ मध्यरात्री भीषण अपघात; ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे

पंढरपूर वारीसाठी नातेवाईकांना सोडून परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टरला गॅस टँकरची धडक; एक जण ठार, १५ जण जखमी

कजगावजवळ मध्यरात्री भीषण अपघात; ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे

भडगाव, प्रतिनिधी : तालुक्यातील कजगावजवळ मंगळवारी मध्यरात्री झालेल्या भीषण रस्ते अपघातात महिंदळे येथील दिनकर भदाणे (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिलांसह १५ जण जखमी झाले आहेत. पंढरपूर वारीसाठी नातेवाईकांना सोडून आपल्या गावाकडे परतत असलेल्या भाविकांच्या ट्रॅक्टरला भरधाव गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.

ही घटना मंगळवारी मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास घडली. धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरचे अक्षरशः दोन तुकडे झाले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णवाहिकांद्वारे चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अपघातात महिंदळे येथील दिनकर भदाणे यांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. तसेच अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

या भीषण दुर्घटनेमुळे वारीसाठी निघालेल्या कुटुंबांवर शोककळा पसरली असून परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button