जळगावात दोन गटांत हाणामारी, धारदार शस्त्रांचा वापर

जळगावात दोन गटांत हाणामारी, धारदार शस्त्रांचा वापर
जळगाव प्रतिनिधी
शहरातील वाल्मिक नगर बगीचाजवळ मंगळवारी (११ मार्च) रात्री ११ वाजता दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली. यामध्ये धारदार शस्त्रांचा वापर करून एकमेकांवर हल्ले करण्यात आले, त्यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी बुधवारी (१२ मार्च) दुपारी शनीपेठ पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
योगेश ज्ञानेश्वर सोनवणे (वय ३१, रा. वाल्मिक नगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तो मंगळवारी रात्री बगीचाजवळ उभा असताना, त्याच परिसरातील
ज्ञानेश्वर उर्फ बाळू प्रल्हाद रायसिंगे , रोहित ज्ञानेश्वर रायसिंगे , हेमंत प्रल्हाद रायसिंगे , धीरज ज्ञानेश्वर रायसिंगे ,सागर सुकलाल तायडे (सर्व रा. वाल्मिक नगर, जळगाव) यांनी जुन्या वादातून शिवीगाळ करत त्याच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने गळ्यावर, डोक्यावर आणि पाठीवर वार करून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे . दुसर्या तक्रारीत ललिता हेमंत रायसिंगे (वय ३५, रा. वाल्मिक नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, योगेश सोनवणे याने शिवीगाळ करून घरातून तलवार आणून धमकी दिली. त्याचा भाऊ रोहित रायसिंगे समजवण्यासाठी गेला असता, त्यालाही शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.
या हाणामारीत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने शनीपेठ पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे नोंदवले असून, अधिक तपास सुरू आहे.