Social

संत सावता माळी महाराज पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा मिरवणूक, गुणगौरव व महाप्रसाद सोहळा उत्साहात साजरा

संत सावता माळी महाराज पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा मिरवणूक, गुणगौरव व महाप्रसाद सोहळा उत्साहात साजरा

भडगाव/प्रतिनिधी

संत सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त माळी पंच मंडळ व महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रतिमा मिरवणूक, गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.


सकाळी शहरातील शनी चौक येथे संत सावता माळी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष साहेबराव महाजन, सचिव विनोद महाजन व माळी पंच मंडळाचे अध्यक्ष मनोज महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर वाद्यवृंदाच्या गजरात पुरुष व महिला भजनी मंडळींच्या सहभागाने प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली. भजन, कीर्तन व जयघोषामुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. शनी चौक, बाजारपेठ, खोल गल्ली, मेन रोड मार्गे मिरवणूक कै. लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालय येथे पोहोचून समारोप करण्यात आला.
यानंतर माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष मालचे, पोलीस निरीक्षक महेश टाक, माळी पंच मंडळाचे अध्यक्ष मनोज महाजन, महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष साहेबराव महाजन, सचिव विनोद महाजन, बालविकास संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब महाजन, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, गटनेता लाखिचंद पाटील, नगरसेवक अलीम शहा, हाशिम मिर्झा, जगनभाई, देवा अहिरे, इम्रान सय्यद, अमोल पाटील, सचिन चोरडिया, जितेंद्र पाटील, मुरलीधर भील, विजय भोसले, शशी वाणी, डॉ. प्रमोद पाटील, राहुल ठाकरे, संतोष महाजन, चर्मकार महासंघाचे अध्यक्ष रवी अहिरे, नगरसेविका योजनाताई पाटील, वैशाली महाजन आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ समाजसेवक तथा पत्रकार शिवदास महाजन, पत्रकार अशोक परदेशी, नाभिक महामंडळाचे तालुकाध्यक्ष संजय पवार, माळी पंच मंडळाचे माजी अध्यक्ष मुकुंद महाजन, गोविंद महाजन, अनिल महाजन, माळी पंच मंडळाचे सचिव डॉ. प्रकाश बच्छाव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भिकन महाजन, डॉ. प्रकाश बच्छाव, मनोज महाजन, गणेश महाजन, गोकुळ महाजन, सागर महाजन, अनिल महाजन, अॅड. विजय महाजन, आबा महाजन, विकास महाजन,शिवदास महाजन, शुभम महाजन, अशोक महाजन, मुकुंद महाजन, रमेश महाजन, सुनील महाजन, रावसाहेब महाजन, बबलू महाजन, विजय माळी,देवराम महाजन, रवी महाजन आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण महाजन यांनी केले. प्रास्ताविक साहेबराव महाजन यांनी केले, तर आभार नितीन महाजन यांनी मानले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button