सून्नी ईदगाहवर नमाझे ईद – ऊल – अझहा अदा

सून्नी ईदगाहवर नमाझे ईद – ऊल – अझहा अदा
जळगाव ;- दरसालबादा प्रमाणे यंदाही मुस्लिम बांधवांचा महत्वपूर्ण व पवित्र सण ईद – ऊल – अझहा (बकरी ईद ) निमित्त सून्नी मुस्लिम बांधवांनी आज दि. 07/06/2025 शनिवारी ईद ची विशेष नमाझ (प्रार्थना ) नमाझे ईद – ऊल – अझहा (बकरी ईद ची विशेष नमाझ ) सून्नी ईदगाह मैदान, नियाज अली नगर, सुप्रीम कॉलोनी, जळगाव या ठिकाणी सकाळी 08:30 वाजता उत्साहात, आनंदात व अत्यन्त भक्तीभावात मौलाना जाबीर रझा यांच्या नेतृत्वात अदा ( पठन ) करण्यात आली.
सर्व प्रथम सून्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव व सून्नी जामा मस्जिद जळगाव चे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली यांनी सर्व समाज बांधवांचे तसेच जळगाव जिल्हा पोलीस दल व एम. आय. डि. सि. पो. स्टे. जळगाव व जळगाव शहर महानगर पालिका जळगाव चे नमाज साठी व ईद साजरी करण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल आभार मानले. तसेच सर्वांनी ईद साजरी करतांना कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही, व ज्या पशूंची कुर्बानी करण्याची परवानगी शासनाने दिलेली आहे त्यांचीच कुर्बानी करावी. साफ सफाई ची विशेष काळजी घ्यावी. कायदा व सुवेवस्था अबाधित राहून अप्रिय घटना घटू नये याची काळजी घ्यावी असे सांगितले. या प्रसंगी सुमारे आठ हजार लोक नमाज साठी ईदगाहवर उपस्थित होते. या प्रसंगी तरिका – ए – नमाझ (नमाझ पठणाची पद्धत ) मौलाना नजमूल हक यांनी सांगितली. बयान (प्रवचन ) मौलाना अलीम रझा यांनी केले. या प्रसंगी ” ए अल्लाह हमारी, हमारे मुल्क भारत की हिफाझत फरमा, बेरोजगारोको रोजगार अता फरमा, बिमारोको शिफा अता कर ” अशी दुआ ( प्रार्थना ) करण्यात आली त्याला सर्वानी आमीन म्हणून दाद दिली.
या प्रसंगी सै. अयाज अली नियाज अली, मौलाना जाबीर रझा, इकबाल वझीर, मौलाना नजमूल हक, मौलाना खलील बरकाती , मौलाना अलीम रझा, अफझल मनियार, मुख्तार शाह, साबीर मुत्सुफाबादी, उमर खान, रहेमत अली, जमील शेख यांसह आठ हजार नमाजी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सलातो सलाम ने करण्यात आली.