सुख म्हणजे काय असते ते हेच असते :आम्ही लढलो आम्ही जिंकलो

सुख म्हणजे काय असते ते हेच असते :आम्ही लढलो आम्ही जिंकलो
स्व नरेंद्र अण्णा प्रतिष्ठान तर्फे सुतार दाम्पत्याचा संसार पुन्हा उभा केला
जळगाव प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने वृद्ध सुतार दांपत्याचे घर उध्वस्त केले होते, मात्र स्वर्गीय नरेंद्र अण्णा पाटील प्रतिष्ठान आणि मित्र परिवाराने हे घर पुन्हा उभे करून या दांपत्याला उभारी दिली आहे, त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे,
सदर वृद्ध दांपत्यांना मदत करण्यासाठी स्व.नरेंद्रअण्णा पाटील प्रतिष्ठान जळगावचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन यांचे सदस्य असलेले विजय जोशी, देवेश शर्मा, किशोर पाटील,अरविंद देशमुख, परमवीर जाधव, हर्षल सिंकवाल, योगेश निंबाळकर अमरनाथ ठाकूर, युसुफ भाई मकरा, रवींद्र शिंदे, आयुष मणियार, पियुष मणियार, अमोल पाटील, युवराज जगताप, सुशील शिंदे, निखिल पोपटांनी, निखिल पाचपांडे, अमेय राणे, रितेश चौधरी, प्रशांत चौधरी, सौरभ भोई, पवन भोई, अजिंक्य पाटील, तन्मय चौधरी, आकाश पाटील, आदेश देशमुख, सुनय पाटील, मयूर चौधरी, अण्णा मराठे, कुणाल धांडे इत्यादी लोकांनी आर्थिक सहाय्य करून श्रमदानाची भूमिका बजावली.