Other

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’ अमळनेर चॅप्टरच्या अध्यक्षपदी विनोद थोरात; हितेश पाटील सचिव, प्रीतम पाटील खजिनदार

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’ अमळनेर चॅप्टरच्या अध्यक्षपदी विनोद थोरात; हितेश पाटील सचिव, प्रीतम पाटील खजिनदार

अमळनेरमध्ये उद्योजकांना एकत्र आणून व्यवसायवृद्धीसाठी विविध उपक्रम राबविणार; नवीन सभासद नोंदणीला प्रारंभ

अमळनेर | प्रतिनिधी :
महाराष्ट्रीयन उद्योजकांचे सक्षम व्यावसायिक नेटवर्क निर्माण करून परस्पर सहकार्याच्या माध्यमातून आर्थिक व व्यावसायिक प्रगती साधण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या **’सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’**च्या अमळनेर चॅप्टरच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदी विनोद थोरात, सचिवपदी हितेश पाटील आणि खजिनदारपदी प्रीतम पाटील यांची निवड करण्यात आली.

जळगाव जिल्ह्यात गेल्या २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’च्या माध्यमातून उद्योजक, व्यावसायिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणून विचार, अनुभव आणि व्यवसायातील संधींचे आदानप्रदान केले जाते. याच उद्देशाने अमळनेर चॅप्टरची नव्याने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

नवीन अध्यक्ष विनोद थोरात (संचालक, पारस गोल्ड), सचिव हितेश पाटील (संचालक, सनहिल्स सोलर टेक्नॉलॉजीस) आणि खजिनदार प्रीतम पाटील (संचालक, तोरणाई कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स) यांनी आपल्या कार्यकाळात क्लबचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी जळगाव रिजन हेड अभिजित पाटील, डेप्युटी रिजन हेड दीपक पाटील, एक्स्पान्शन हेड (जळगाव साऊथ रिजन) गोकुळ चौधरी तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर चॅप्टरला नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. क्लबच्या “एकमेका साह्य करू, अवघे होऊ श्रीमंत” या ब्रीदवाक्यानुसार तालुक्यातील उद्योजकांसाठी विविध मार्गदर्शन, नेटवर्किंग व व्यवसायवृद्धीचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, अमळनेर चॅप्टरची नवीन सभासद नोंदणी सुरू असून इच्छुक उद्योजकांनी अध्यक्ष विनोद थोरात, सचिव हितेश पाटील किंवा खजिनदार प्रीतम पाटील यांच्याशी संपर्क साधून सदस्यत्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button