Education

आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष

आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष

प्राचार्यांच्या हस्ते पालखी पूजन; टाळ-मृदुंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

जळगाव, – गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय वातावरणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्राचार्या नीलिमा चौधरी यांच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठलनामाच्या अखंड जयघोषात पालखी सोहळा व पारंपरिक रिंगण सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत वारकरी संप्रदायाची परंपरा जिवंत केली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ, मृदुंग, भगवे पताके, तुळशी वृंदावन तसेच विठ्ठल-रुक्मिणी यांच्या आकर्षक वेशभूषेत पंढरपूरच्या वारीचे प्रभावी दर्शन घडविले.कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरलेल्या रिंगण सोहळ्याने उपस्थितांची विशेष मने जिंकली. विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध, भावपूर्ण आणि आकर्षक पद्धतीने रिंगण साकारत प्रत्यक्ष पंढरपूरच्या वारीचा अनुभव उपस्थितांना दिला. “ज्ञानोबा-तुकाराम” तसेच “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” या जयघोषांनी संपूर्ण शाळा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेची, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या विचारांची तसेच भक्ती, समता, सेवा आणि एकात्मतेच्या मूल्यांची प्रेरणा देण्यात आली. भारतीय संस्कृती आणि परंपरांप्रती विद्यार्थ्यांमध्ये आदरभाव निर्माण करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या प्राचार्या नीलिमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे, आकर्षक सादरीकरणामुळे आणि पालखी-रिंगण सोहळ्याच्या भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत आनंददायी व संस्मरणीय ठरला. उपस्थित पालक व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या अभिनयाचे, सांस्कृतिक सादरीकरणाचे आणि वारकरी परंपरेच्या प्रभावी सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button