भारतीय जैन संघटना जळगांव शाखेकडून कॅन्सर दिवस निमित्त व्याख्यानाचे आयोजन

भारतीय जैन संघटना जळगांव शाखेकडून कॅन्सर दिवस निमित्त व्याख्यानाचे आयोजन
जळगाव प्रतिनिधी
भारतातील एक महत्वाची आरोग्य समस्या ही कर्करोग असून त्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे आणि त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कॅन्सर या शब्दा बाबत सामान्यतः: लोकांमध्ये एका प्रकारची भिती असते. कॅन्सरला घाबरण्याऐवजी लोकांना कॅन्सर आणि त्याच्या उपचाराबाबत माहीती व्हावी यासाठी भारतीय जैन संघटना यांच्या वतीने मार्गदर्शन तथा व्याख्यान चे आयोजन सोमवार दि. ०३ फ्रेबुवारी दुपारी 2-30 वाजता स्वाध्याय भवन जळगांव येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जळगांव शहरातील कॅन्सर सर्जन डॉ. श्रध्दा चांडक करणार आहेत.
भारतीय जैन संघटना जळगांव शहरच्या वतीने या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त उपस्थित राहावे असे आवाहन लाभ घ्यावा अध्यक्ष अजय राखेचा, उपाध्यक्ष ऍड संतोष चोपडा, सचिव सी.ए. अजय लोढा , कोषाध्यक्ष प्रमोद साबद्रा ,सचिव . धर्मेंद्र ओसवाल, जनसंपर्क अधिकारी ईश्वर छाजेड व सुशिल बहुउद्देशीय मंडळ यांनी केळे आहे.