शेगाव तालुक्यांमध्ये अनेकजण झाले शाकाल ; टक्कल पडण्याच्या साथीने झाले बेहाल !

बुलढाणा प्रतिनिधी – केसांचे गळणे काही प्रमाणात सहन होण्यासारखे असून एका व्यक्तीचे ठीक असल्यावर याची लागण मात्र अनेक गावांमध्ये लोकांना टक्कल पडल्याची झाली असून या गावांमध्ये गावकरी हैराण झाले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगावातील पाण्यात नायट्रेटसारखा अत्यंत विषारी घटक मोठ्याप्रमाणावर आढळून आला आहे. पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढली असल्याचं पाण्याच्या तपासणीत उघड झालं आहे, त्यामुळे गावकऱ्यांसाठी हे पाणी विष ठरत आहे. खारबाण पट्ट्यातील या गावात पिण्याच्या पाण्याची वेगळी सोय केलेली आहे, मात्र वापण्याच्या पाण्यात नायट्रेटसारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्यामुळे हे पाणी वापरायोग्य नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
बोंडवळ,कालवड,कठोरा,हिंगणा गावातील नागरिक आणि लहान मुलं सध्या चिंतेत आहेत. कारण या गावातल्या लोकांना अचानक टक्कल पडू लागल्याने त्यांच्या मनामध्ये गेल्या काही दिवसांपासून गावातल्या लोक केसगळतीने हैराण झालेत. अगदी केसांवरुन हात जरी फिरवला तरी केस गळत असल्याने लोकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलंय. गेल्या पाच ते सहा दिवसातच मोठ्या प्रमाणात केस गळतीमुळं अनेकांना टक्कल पडलंय. या आजाराने गावात शिरकाव केल्यानं गावकरी भयभीत झाले आहेत.