माहिजी येथे तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या जोडणीमुळे रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल

माहिजी येथे तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या जोडणीमुळे रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल
भुसावळ प्रतिनिधी l भुसावळ रेल्वे विभागातील जळगाव-मनमाड मार्गावर माहिजी स्थानकाजवळ तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या जोडणीसाठी यार्ड रीमॉडेलिंगचे काम हाती घेण्यात आले असून, या कामाअंतर्गत १२ जून २०२५ रोजी नॉन-इंटरलॉकिंग प्रक्रिया होणार आहे, यामुळे काही रेल्वेगाड्यांच्या सेवा तात्पुरत्या प्रभावित होणार आहेत. या दिवशी ११११९ इगतपुरी-भुसावळ मेमू व १११२० भुसावळ-इगतपुरी मेमू या दोन गाड्या पूर्णतः रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या मार्गात थांबवून ठेवण्यात येणार आहेत. यात १२७४१ वास्को-द-गामा-पटना एक्सप्रेस ही गाडी १ तास ३० मिनिटे, १२१७१ एलटीटी-हरिद्वार एक्सप्रेस ४५ मिनिटे, तसेच ०५५५८ एलटीटी-रक्सौल एक्सप्रेस ४५ मिनिटे रेग्युलेट करण्यात येणार आहेत. याशिवाय काही गाड्यांच्या प्रस्थान वेळेत बदल करण्यात आला असून, १२१६५ एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस सकाळी ७.४५ वाजता (मूळ वेळ : ६.००) व १५०१७ एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस सकाळी ७.३५ वाजता (मूळ वेळ : ६.३५) प्रस्थान करणार आहे. यार्ड रीमॉडेलिंगच्या कामामुळे होणाऱ्या बदलांची माहिती प्रवाशांनी लक्षात घ्यावी व प्रवासाच्या अगोदर गाडीच्या वेळांची खात्री करूनच स्टेशनकडे जावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.