Other

टाकळी प्र. चा. ग्रामपंचायत परिसरात वीज समस्येवरून आंदोलनाचा इशारा

टाकळी प्र. चा. ग्रामपंचायत परिसरात वीज समस्येवरून आंदोलनाचा इशारा

ग्रामीण अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना निवेदन 

टाकळी प्र. चा. (ता.- चाळीसगाव ):
टाकळी ग्रामपंचायत हद्दीतील सदगुरू नगर परिसरात बसवण्यात आलेल्या वीज वितरण (डीपी) केंद्रावर सध्या सिंगल फेज कनेक्शन असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. या डीपीवर त्वरित थ्री फेज कनेक्शन देण्यात यावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय जनमंच पक्षातर्फे देण्यात आला आहे.

सदगुरू नगर परिसरात सुमारे एक ते दोन हजार लोकसंख्या वास्तव्यास असून, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, सिंगल फेज वीज पुरवठ्यामुळे वारंवार वीज खंडित होणे, कमी-जास्त व्होल्टेजचा त्रास अशा समस्या उद्भवत आहेत. यामुळे घरगुती उपकरणे जसे की टीव्ही, फ्रिज, पंखे इत्यादी खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या संदर्भात नागरिकांनी अनेक वेळा महावितरण (एमएसईबी) कार्यालयाकडे लेखी तक्रारी दिल्या असूनही संबंधित अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

तरी संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करावा व संबंधित डीपीवर थ्री फेज कनेक्शन जोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा राष्ट्रीय जनमंच पक्षातर्फे एमएसईबी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

निवेदनावर  तालुका अध्यक्ष सुरेश अर्जुन वेलीस, निलेश तात्या साळुंखे, रविंद्र भिवसन गढरी, रघुनाथ काशिनाथ महाजन, योगेश भाऊदास निकम,
रविंद्र हिरालाल महाजन. कुसुम रविंद्र मिस्त्री, सुनिता सर्जेराव शिंदे, सोपान मोतीराम पाटील, देवराम नामदेव पाटील, संजय भाऊदास गढरी, रमेश देवलाल गुजर, वैशाली सुनील पवार, बापू रंगा पाटील आदीच्या सह्या आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button