Other

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण; पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण; पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जळगाव, प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY) या महत्त्वाकांक्षी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर 19 जून रोजी देशभरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO), जळगाव कार्यालयातर्फे जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या जैन हिल्समधील गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृह येथे उद्या दि. 19 ला संध्याकाळी 4 वाजेला विकसीत भारत या संकल्पनेतून पीएम-व्हीबीआरवाय ह्या योजनेतील विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे ₹2,400 कोटींचे प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना (डीबीटी) द्वारे हस्तांरीत केले जाणार आहे.

जळगाव येथील कर्मचारी भविष्य निधी संघटनेतर्फे प्रादेशिक कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमास महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटिल, जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ, जळगावचे आमदार सुरेश भोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. त्यांच्यासोबत विभागीय भविष्य निधी आयुक्त-2 मनोज कोळी, सहाय्यक भविष्य निधी आयुक्त मोहित दीक्षित उपस्थीत राहणार आहेत. या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी, नियोक्ते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात केंद्रीय कामगार व रोजगार तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे उपस्थीत असतील. पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे ₹2,400 कोटींचे प्रोत्साहन अनुदान थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने वितरित केले जाईल. या माध्यमातून देशभरातील 15 लाखांहून अधिक नागरिकांना अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध होण्यास चालना मिळणार आहे. PM-VBRY ही रोजगारनिर्मितीला चालना देणारी केंद्र सरकारची रोजगार-संलग्न प्रोत्साहन योजना असून, प्रथमच संघटित क्षेत्रात रोजगार मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या वेतनाएवढी, कमाल ₹15 हजारांची मदत दिली जाते. तसेच अतिरिक्त रोजगार निर्माण करणाऱ्या नियोक्त्यांनाही प्रोत्साहन अनुदान दिले जाते. देशभरात दोन वर्षांत 3.5 कोटींहून अधिक रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट या योजनेसमोर ठेवण्यात आले आहे. पुणे क्षेत्रात या योजनेअंतर्गत आतापर्यंत 75,711 कर्मचाऱ्यांना ₹42.79 कोटींपेक्षा अधिक लाभ, तर 6,351 नियोक्त्यांना ₹145.16 कोटींपेक्षा अधिक प्रोत्साहन वितरित करण्यात आले आहे. देशभरातील 200 ठिकाणी एकाचवेळी होणाऱ्या या कार्यक्रमात 9 हजार नियोक्ता प्रतिनिधी आणि 45 हजार कर्मचारी सहभागी होतील. कार्यक्रमांमुळे रोजगार निर्मिती, रोजगाराला प्रोत्साहन आणि सामाजिक सुरक्षेचा विस्तार या केंद्र सरकारच्या उद्दिष्टांना अधिक बळ मिळेल, जैन हिल्स येथे होणाऱ्या कार्यक्रमात जळगाव कर्मचारी भविष्य निधी संघटनेतील प्रादेशिक परिसरातील लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय भविष्य निधी आयुक्त-2 मनोज कोळी, सहाय्यक भविष्य निधी आयुक्त मोहित दीक्षित यांनी केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button