तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार २०२५ साठी प्रस्ताव करण्याचे आवाहन

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार २०२५ साठी प्रस्ताव करण्याचे आवाहन
जळगाव, : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत साहसी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यासाठी तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारांतर्गत जमीन, पाणी व हवाई साहसी उपक्रमांसाठी प्रत्येकी एक पुरस्कार तसेच साहसी क्षेत्रातील आजीवन योगदानासाठी एक स्वतंत्र पुरस्कार दिला जातो.
तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन २०२५ करिता केंद्र शासनाकडे शिफारस करण्यासाठी नामांकन प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. नामांकन सादर करणाऱ्या खेळाडूची कामगिरी सन २०२३, २०२४ व २०२५ या मागील तीन वर्षांतील असणे आवश्यक आहे. संबंधित साहसी उपक्रम हे जमीन, पाणी व हवाई स्वरूपातील असावेत तसेच खेळाडूची कामगिरी अतिउत्कृष्ट असणे आवश्यक आहे.
पुरस्कारासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येणार असून, केंद्र शासनाच्या https://awards.gov.in/ या पोर्टलवर दि. ३० जुलै ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत अर्ज सादर करता येतील. ऑफलाईन अर्जांचा विचार केला जाणार नाही.
गिर्यारोहक तसेच साहसी उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी केले आहे.






