Social

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व कलादर्पणचा संयुक्त उपक्रम; डॉ. महिमा मिश्रा अय्यंगार व शिष्यांचा कलाविष्कार

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व कलादर्पणचा संयुक्त उपक्रम; डॉ. महिमा मिश्रा अय्यंगार व शिष्यांचा कलाविष्कार

जळगाव (प्रतिनिधी): अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, जळगाव जिल्हा शाखा आणि कलादर्पण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता ‘अवतारम्’ या विशेष कथक नृत्य संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. एम. जे. कॉलेज परिसरातील कालिदास सभागृहात हा शास्त्रीय नृत्याचा भव्य सोहळा रंगणार आहे.

या कार्यक्रमात शहरातील प्रख्यात नृत्यांगना डॉ. महिमा मिश्रा अय्यंगार आणि त्यांच्या शिष्या कथक नृत्यातून विविध रूपांतील भगवान विष्णू यांच्या ९ अवतारांवर आधारित ‘अवतारम्’ ही संकल्पना रंगमंचावर साकारणार आहेत. भारतीय शास्त्रीय नृत्याची समृद्ध परंपरा, लय आणि भावमुद्रांचा अप्रतिम संगम या सादरीकरणातून रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

या सोहळ्यास प्रवेश विनामूल्य असून, जळगावातील सर्व रसिक प्रेक्षक, कलावंत आणि नृत्यप्रेमींनी या देखण्या शास्त्रीय नृत्य सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष ॲड. संजय राणे आणि कलादर्पणचे उपाध्यक्ष पद्मनाभन अय्यंगार वतीने करण्यात आले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button