सहा बंडखोर खासदारांच्या निषेधार्थ ठाकरे गटाचे आंदोलन
सहा बंडखोर खासदारांच्या निषेधार्थ ठाकरे गटाचे आंदोलन
जळगाव (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जळगाव शहरात सहा बंडखोर खासदारांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. महानगर प्रमुख शरद आबा तायडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात संबंधित खासदारांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पक्षनिष्ठा आणि शिवसेनेची विचारधारा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
या आंदोलनात शिवसेना महिला महानगर प्रमुख मनीषाताई पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख प्रमोदभाऊ घुगे, किरण भावसार, गणेश गायकवाड, जिल्हा उपसंघटक योगेश चौधरी, राजेंद्र पाटील, मनसेचे प्रदीप पाटील, विनायक धर्माधिकारी, प्रेमराज राठोड, डॉ. रमाकांत कदम, भीमराव पांडव, अरुण सोनवणे, राजू पाटील, किरण ठाकूर, स्वप्नील राजपूत, संदीप माळी, किशोर धनगर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






