EducationSocial

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

जळगाव जळगाव जिल्ह्यातील युवकांना नामांकित औद्योगिक कंपनीत करिअर घडविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि निमजाई फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. कंपनीत “शिका व कमवा” या धोरणाअंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मेळावा दिनांक १९ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून निमजाई फाउंडेशन (ट्रेनिंग सेंटर, कालीका माता मंदिर परिसर, स्टेट बँक ऑफ इंडिया वर, जळगाव) येथे आयोजित करण्यात आला असून, उमेदवारांची जागेवरच निवड केली जाणार आहे.

या उपक्रमांतर्गत ऑटोमोटिव्ह वेल्ड टेक्निशियन, ऑटोमोटिव्ह पेंट टेक्निशियन, ऑटोमोटिव्ह असेंब्ली टेक्निशियन आणि मेकॅट्रॉनिक्स टेक्निशियन या ट्रेडमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी दोन वर्षांचा असून त्यानंतर एक वर्षाची अप्रेंटिसशिपची संधी मिळणार आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तांत्रिक शिक्षण, प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

या भरतीसाठी १८ ते २५ वयोगटातील १०वी, १२वी, आयटीआय, डिप्लोमा, बी.कॉम व बी.एस्सी उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवासी व भोजन सुविधा, शैक्षणिक साहित्य तसेच मासिक विद्यावेतन दिले जाणार आहे. पहिल्या वर्षी रुपये १७,०८०/- तर दुसऱ्या वर्षी रुपये १८,४४१/- इतके विद्यावेतन देण्यात येईल.

इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर नोंदणी करून उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावा. तसेच ज्या उमेदवारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह मेळाव्याच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त संदीप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राउंडजवळ, जळगाव येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button