Other

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय  उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय  उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगाव, दि. १६ : उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन अंतर्गत सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम विकास कार्यालय, मुंबई आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव येथील सेमिनार हॉलमध्ये एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सत्यजीत साळवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम विकास कार्यालय, मुंबईचे उपसंचालक प्रफुल्ल उमरे, जिल्हा उद्योग केंद्र, व्यवस्थापक ए. टी. पाटील, खादी ग्रामोद्योग अधिकारी जगदीश पाटील, उपप्राचार्य एन. जी. बावस्कर तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जळगावचे प्रकल्प अधिकारी विजय सैंदाणे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. सत्यजीत साळवे यांनी आत्मनिर्भरतेसाठी आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्व अधोरेखित केले. मुंबई उपसंचालक प्रफुल्ल उमरे यांनी प्रभावी संवाद कौशल्य, आत्मविश्वास आणि उद्योजकतेच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धीची संधी याविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक ए. टी. पाटील यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबत माहिती दिली. प्रकल्प अधिकारी विजय सैंदाणे यांनी विपणन विषयातील विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे चारुदत्त सूर्यवंशी, कुंदन पाटील, विभावरी तायडे, मधुकर म्हसके, फहीम शेख, मंगेश बिंगे, चाँदनी चिरमाडे तसेच अन्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास लाभार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन विवेक सैंदाणे यांनी केले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button