Politics

कर्जोद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रिशाद बी खान यांची बिनविरोध निवड

कर्जोद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रिशाद बी खान यांची बिनविरोध निवड

रावेर प्रतिनिधी l रावेर तालुक्यातील कर्जोद ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी रिशाद बी बसिर खान यांची आज मंगलवारी बिनविरोध निवड करण्यात आली. रिशाद बी यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके फोडून आपला आनंद साजरा केला.

कर्जोद ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा विनोद सावले यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता.त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी मंगलवारी ग्रामपंचायत कर्जोद कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.यावेळी सरपंच पदासाठी रिशाद बी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यासीन तडवी यांनी रिशाद बी यांची बिनविरोध निवड जाहीर केली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांना तलाठी यांनी मदत केली यावेळी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक,आजी माजी सरपंच,उपसरपंच,सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरपंच पदी निवड जाहीर झाल्या नंतर गावकऱ्यांनी रिशाद बी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच यांनी दिली आहे. यावेळी माजी सरपंच सुरेखा सावळे,मोहन महाजन
अशोक वनारे,नरेंद्र महाजन,राजेंद्र तडवी,अरुणा महाजन,सुलभा महाजन, सविता महाजन,समाधान महाजन,रेखा ससाणे,हाजी सरफराज शेख,शकील शेख,अकील खान,वलिमत तडवी,मुझफ्फर अली,मोहसीन सर अलीस शेख,आशिष पाठक,इम्रान शेख आदी उपस्थित होते

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button