Social
सीए परीक्षेत पार्थ लाहोटी याचे यश

जळगाव :- चार्टर्ड अकाउंटंट अर्थात सीए परीक्षेत पार्थ रजनीश लाहोटी याने अभूतपूर्व यश मिळवत दोन्ही ग्रुप्स पहिल्याच प्रयत्नात (फर्स्ट अटेम्प्टमध्ये) उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.
BDO मुंबई व भदादे अकादमी जळगाव येथुन आर्टिकलशीप व मार्गदर्शन घेऊन त्याचे अजोबा सी ए रमेश लाहोटी यांच्यानंतर 55 वर्षांनी तिसऱ्या पिढीत चार्टर्ड अकाउंटंट होण्याची परंपरा कायम ठेवून परिवाराचं जळगाव शहराचेही नाव उंचावले आहे
त्यांच्या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार आणि शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शनिवार दि. ४ जानेवारी रोजी भदादे अकादमी तर्फे सर्व यशस्वी सीए परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.