PoliticsSocial

प्रदीप व पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा पश्चिम अध्यक्षपदी नियुक्ती

प्रदीप व पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा पश्चिम अध्यक्षपदी नियुक्ती

भडगाव ( प्रतिनिधी ) अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा पश्चिम अध्यक्षपदी वडजी (ता. भडगाव) येथील प्रदीप भिकनराव पाटील यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीनंतर या नियुक्तीस मंजुरी देण्यात आली असून, राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रमोद जाधव यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान करण्यात आले.

नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय सरचिटणीस प्रमोदजी जाधव साहेब, विभागीय अध्यक्ष चंद्रकांतजी बनकर साहेब, जिल्हा युवक अध्यक्ष व्यकंटजी मोरे साहेब आणि उत्तर महाराष्ट्र प्रमुख नानासाहेब बाच्छाव यांच्या शुभहस्ते प्रदीप भिकनराव पाटील यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख हरिभाऊ तुकाराम पाटील, जळगाव जिल्हा संघटक प्रा. राकेश सोनवणे सर तसेच भडगाव तालुका कार्याध्यक्ष चेतनभाऊ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रदीप भिकनराव पाटील यांची ही नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली असून, त्यांच्या कार्यक्षेत्रात चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, पारोळा, एरंडोल आणि अमळनेर या तालुक्यांचा समावेश आहे. या भागात संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, नवीन सदस्य नोंदणीद्वारे संघटनेचा विस्तार करणे तसेच मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

या नियुक्तीबद्दल माननीय अमोलभाऊ शिंदे, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, प्रताप नाना पाटील, वैशालीताई सूर्यवंशी, प्रशांत पवार, सोमनाथ पाटील, विनोद नेरकर, देविदास पाटील, अनिलभाऊ वाघ, आबा महाजन, सचिन चोरडिया, जितू पाटील, धनराज पाटील, योगेश शेलार, डॉ. पूनम पाटील, नूतन पाटील, योजना पाटील, योगिता वाघ, कुणाल पाटील आणि निलेश पाटील यांनी प्रदीप भिकनराव पाटील यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रदीप भिकनराव पाटील यांच्या या नियुक्तीमुळे जळगाव जिल्हा पश्चिम भागात अखिल भारतीय मराठा महासंघाचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button