Other

प्रेमचंद नगरातील ज्येष्ठ नागरिक सुधाकर वारके यांचे निधन

प्रेमचंद नगरातील ज्येष्ठ नागरिक सुधाकर वारके यांचे निधन

जळगाव | प्रतिनिधी

प्रेमचंद नगर, खेडी येथील रहिवासी तथा ज्येष्ठ नागरिक सुधाकर अभिमन वारके यांचे मंगळवारी (दि. २ जून २०२६) सायंकाळी ६.३० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वारके परिवारासह नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.

त्यांची अंत्ययात्रा बुधवारी (दि. ३ जून) सकाळी ९ वाजता प्रेमचंद नगर   येथून राहत्या घरापासून निघून नेरी नाका स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व हरपले

सुधाकर वारके यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे. ते विदगाव परिसर जनता विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत सुधाकर वारके यांचे वडील तसेच डॉ. नीलिमा प्रशांत वारके यांचे सासरे होते.

शांत, प्रेमळ आणि सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सुधाकर वारके यांची ओळख होती. सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रात त्यांनी अनेकांशी स्नेहबंध जपले होते. त्यांच्या निधनामुळे परिवाराने एक आधारवड गमावला असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळी व परिचितांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button