Other

अमळनेरमध्ये पूरपरिस्थितीत नागरिकांचे यशस्वी बचावकार्य

आरोग्य व अग्निशमन विभागाची तत्पर कारवाई; विविध भागांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

अमळनेरमध्ये पूरपरिस्थितीत नागरिकांचे यशस्वी बचावकार्य

आरोग्य व अग्निशमन विभागाची तत्पर कारवाई; विविध भागांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक अडकून पडले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या समन्वयातून आरोग्य व अग्निशमन विभागाच्या पथकाने तातडीने बचाव मोहीम राबवत नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले.

रमाई नगर, म्हाडा नगर, कॉटन मार्केटच्या मागील परिसर, प्रसाद नगर, गुरुकृपा कॉलनी, रूपजी नगर आणि पैलाड या भागांमध्ये पाणी साचल्याने अनेक कुटुंबे अडकली होती. बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत दोर, सुरक्षा साहित्य आणि आवश्यक उपकरणांच्या सहाय्याने नागरिकांना सुखरूप बाहेर काढले.

पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांच्यासाठी आवश्यक मदतीची व्यवस्था करण्यात आली. संपूर्ण बचावकार्य प्रशासन, आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाच्या समन्वयातून पार पडले.

दरम्यान, प्रशासनाकडून शहरातील पूरपरिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे तसेच पाण्याने वेढलेल्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button