HealthSocial

अमळनेर पत्रकार संघ व तेरापंथ युवक परिषदेतर्फे आज भव्य रक्तदान शिबिर

अमळनेर पत्रकार संघ व तेरापंथ युवक परिषदेतर्फे आज भव्य रक्तदान शिबिर

रक्तदात्यांना प्रोत्साहन म्हणून आकर्षक ट्रॉली बॅग भेट

अमळनेर | प्रतिनिधी

‘रक्तदान… जीवनदान… आपका एक कदम, किसी के लिए नई उम्मीद…’ तसेच ‘थेंब तुमचा, जीवन त्यांचे… रक्तदान ही सर्वोत्तम सेवा, मानवतेचा खरा उत्सव’ या संदेशासह अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या आयोजनाने आणि अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेच्या पुढाकाराने आज, १७ सप्टेंबर रोजी अमळनेरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेले हे रक्तदान शिबिर अमळनेर शहरातील दोन ठिकाणी होणार आहे. तेरापंथ भवन, न्यू प्लॉट, अमळनेर तसेच प्रताप कॉलेज व इच्छादेवी चौक परिसरात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत रक्तदान करता येणार आहे.

या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रोत्साहनपर भेट म्हणून आकर्षक ट्रॉली बॅग देण्यात येणार आहे. ‘रक्तदान करा… आयुष्य भेट घ्या… एक छोटी कृती, मोठा फरक!’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून सुरक्षित रक्तदान, निरोगी समाज, उज्ज्वल भविष्य आणि गरजू रुग्णांना नवजीवन देण्याचा संदेश देण्यात येत आहे.

रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या रक्तदान शिबिराला रोटरी क्लब अमळनेर, रोट्रॅक्ट क्लब अमळनेर, लायन्स क्लब अमळनेर, न्यू प्लॉट परिसर विकास मंच, जैन सोशल ग्रुप तसेच जय बजरंग व्यायामशाळा, अमळनेर यांचे सहकार्य लाभत आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button