Other

महामंडळाचे कर्ज नियमित भरण्याचे आवाहन

महामंडळाचे कर्ज नियमित भरण्याचे आवाहन

थकीत कर्जदार व जामीनदारांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा

जळगाव, प्रतिनिधी: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. समाजाचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास व्हावा, या उद्देशाने महामंडळामार्फत विविध कर्ज योजनांसह एनएएसएफडीसी कर्ज योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कर्ज वितरण करण्यात आले आहे. मात्र, कर्जाची वसुली अत्यल्प असल्याने मंजूर कर्जधारकांना कर्ज वितरणासाठी निधी उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे थकीत कर्जदारांनी त्यांच्याकडील थकीत कर्जाची रक्कम नियमित भरणे आवप्रतिनिधी

महामंडळामार्फत विशेष वसुली अभियान राबविण्यात येत असून थकीत कर्जदारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याअंतर्गत कर्जदारांना वसुली भरण्याबाबत नोटीस देणे, कर्जदार व जामीनदारांच्या घरी भेटी देऊन अंतिम नोटीस देणे, सरकारी कर्मचारी जामीनदारांच्या वेतनातून कर्जाची रक्कम कपात करण्याबाबत कार्यवाही करणे तसेच मालमत्ता धारक जामीनदारांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. वसुलीसाठी दिलेले धनादेश बँकेत जमा करण्यात येतील. धनादेश परत आल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच गाव-वस्तीत वसुली मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.

महामंडळाकडून व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाच्या रकमेचा गैरवापर करून प्रत्यक्ष व्यवसाय सुरू न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित लाभधारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. थकीत कर्जदारांविरुद्ध लोकअदालतीमध्ये दावे दाखल करण्यात येणार असून, थकीत कर्जदारांच्या कुटुंबीयांनाही महामंडळाच्या कर्ज योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.

जिल्ह्यातील कर्जदार व जामीनदारांनी होणारी कायदेशीर कारवाई व मनस्ताप टाळण्यासाठी आपल्याकडील थकीत कर्जाची रक्कम नियमित भरावी. तसेच सरकारी कर्मचारी जामीनदारांनी संबंधित कर्जदारांना थकीत कर्ज भरण्यास प्रवृत्त करून होणारी कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक गोकुळदास जे. पगारे यांनी केले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button