आषाढी एकादशीनिमित्त कुसुंबे खुर्द येथे गावदिंडी ;विठ्ठल-रुक्मिणीचा देखावा आणि भक्तिमय कार्यक्रम
देवगिरी माध्यमिक विद्यालयाचा अभिनव उपक्रम; दत्त मंदिर परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमला

आषाढी एकादशीनिमित्त कुसुंबे खुर्द येथे गावदिंडी ;विठ्ठल-रुक्मिणीचा देखावा आणि भक्तिमय कार्यक्रम
देवगिरी माध्यमिक विद्यालयाचा अभिनव उपक्रम; दत्त मंदिर परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमला
कुसुंबे खुर्द (प्रतिनिधी) :
आषाढी एकादशीनिमित्त देवगिरी माध्यमिक विद्यालय, कुसुंबे यांच्या वतीने कुसुंबे खुर्द येथे पारंपरिक गावदिंडीचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त विद्यार्थ्यांनी साकारलेला विठ्ठल-रुक्मिणीचा सजीव देखावा, कीर्तन, भजन आणि भक्तिमय नृत्य सादर करत वारकरी परंपरेचे दर्शन घडविले. दत्त मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरपंच मिनाताई पाटील, माजी उपसरपंच प्रमोदभाऊ घुगे आणि पोलीस पाटील राधेश्याम चौधरी यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची आरती करून आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र पाटील यांच्यासह रुपाली चौधरी, माधुरी चौधरी, सुनिता पाटील, जागृती मॅडम, गायत्री मॅडम, वृषाली मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी अमोल माळी, पुष्पा शिंदे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरा, संस्कार आणि सामाजिक ऐक्याची भावना रुजविण्याचा संदेश देण्यात आला.






