Social

भडगाव येथे मेडिकल असोसिएशन तर्फे कडकडीत बंद ; तहसीलदारांना निवेदन

भडगाव येथे मेडिकल असोसिएशन तर्फे कडकडीत बंद ; तहसीलदारांना निवेदन

भडगाव- प्रतिनिधीभडगाव तालुका औषध विक्रेता संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या
ऑल इंडिया देशव्यापी एकदिवसीय केमिस्ट शॉप बंद करण्यात आले होते. ऑल इंडिया,एम.एस.सी.डी.ए. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जगन्नाथ शिंदे तसेच जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशन चे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या नेतृत्वाखाली हा बंद पुकारण्यात आला होता. सदर बंद मध्ये भडगाव तालुक्यातील १६० केमिस्ट बांधव शंभर टक्के मेडिकल दुकाने बंद ठेऊन सहभागी झाले होते.
बंदच्या मागण्या पुढील प्रमाणे

सुरक्षित औषध वितरनासाठी, इ- फार्मसी व बोगस औषध विरोधात, ऑन लाइन औषध विक्री बंद करणे, फार्मसिस्टच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित औषध सेवा टिकवण्यासाठी , रुग्ण सुरक्षा व देशहितासाठी इत्यादी विविध मागण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला होता…
सकाळी अकरा वाजता पारोळा चौफुली भडगाव येथून केमिस्ट बांधवांनी मुक मोर्चा काढून तहसील कार्यालयात तहसीलदार शीतल सोलाट यांना बंद पुकारण्यात आल्या विषयी माहिती व निवेदन देण्यात आले तसेच भडगाव पोलीस स्टेशनचे
पी.एस.आय.प्रताप पाटील यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी तालुका औषध विक्रेता संघटना अध्यक्ष सुरेश भंडारी यांनी बंद विषयी सविस्तर माहिती दिली यावेळी सचिव संजय पाटील, शहर अध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष महेश पाटील, धनंजय वाणी, हर्षल चौधरी,जगदीश सोनवणे, दिलीप राका, ललित बंब, सुनील चौधरी, आसिफ मिर्झा, गोविंद जाधव, गुणवंत पाटील, संदीप भंडारी, सुहास महाजन, राहुल गंजे तसेच भडगाव तालुक्यातील सर्व केमिस्ट उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button