PoliticsSocial

कर आकारणीतील गोंधळाचे निराकरण करा : नगरसेवक अमोल पाटील

कर आकारणीतील गोंधळाचे निराकरण करा : नगरसेवक अमोल पाटील

भडगाव (प्रतिनिधी ) भडगाव येथील नगर परिषदेने सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षात मालमत्ता कर आकारणीतील गोंधळ व अनियमितता दूर करून अतिरिक्त व्याज आकारणी रद्द करण्याची मागणी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी मुख्याधिकाऱ्यांना नगरसेवक अमोल नाना पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. भडगाव नगर परिषदतर्फे सन २०२६-२७या आर्थिक वर्षात दोन टप्प्यात कर आकारणी करण्यात येत आहे. अनेक नागरिकांना मुदतीच्या आत कर आकारणीच्या नोटीस प्राप्त झाल्या नाहीत. मालमत्ता कर आकारणी, त्याची भरणा मुदत, उशिरा प्राप्त नोटीस, स्वतःच्या मालमत्ता करासंदर्भात व प्रक्रियेसंदर्भात अपूर्ण माहिती असणे, यातील प्रशासकिय चुकांमुळे उशिरा कर भरणाऱ्या नागरिकांना आकारण्यात येणाऱ्या अन्यायकारक व्याजामुळे नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या चुकीमुळे नागरिकांना व्याजाचा भुर्दंड सहन करावे लागणे, हे चुकीचे असल्याचे निवेदनात नमूद आहे. कर आकारणीत प्रशासनातर्फे झालेल्या चुकांचे निराकारण करून गोंधळ दूर करावा आणि दुष्काळी पार्श्वभूमीवर नागरिकांकडून व्याज आकारणी न करण्याची मागणी करून दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button