Other

भुसावळ येथील महिला आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

भुसावळ येथील महिला आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त शेकडो महिलांनी घेतला लाभ
भुसावळ : जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव तसेच श्री संत गाडगे महाराज नगरपालिका रुग्णालय, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष महिला आरोग्य शिबिराचे उद्घाटन शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. शिबिराच्या पहिल्याच दिवशी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने महिलांनी तपासणी व मार्गदर्शनाचा लाभ घेतला.या शिबिराचे उद्घाटन प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, सामाजिक कार्यकर्त्या रजनी सावकारे, आरोग्य सभापती मेघा वाणी,वैद्यकिय अधिकारी संदीप जैन, तौसिफ खान यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रसूती व स्त्रीरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.शिबिरामध्ये गर्भाशयाशी संबंधित आजार, गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता, स्तनातील गाठींची तपासणी, गर्भवती महिलांसाठी आयर्न सुक्रोज इंजेक्शनचे महत्त्व, स्तनपानाचे फायदे तसेच महिलांच्या विविध आरोग्य समस्यांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी सविस्तर मार्गदर्शन केले. अनेक महिलांची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी सल्ला देण्यात आला.जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने मातांसाठी विशेष समुपदेशन सत्रही आयोजित करण्यात आले. यामध्ये नवजात बालकांसाठी स्तनपानाचे महत्त्व, पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तनपान देण्याचे फायदे, माता व बालकांच्या आरोग्यासाठी स्तनपानाची भूमिका याबाबत माहिती देण्यात आली.शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आयोजकांनी समाधान व्यक्त केले. १ ते १० ऑगस्ट या कालावधीत दररोज सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हे शिबिर सुरू राहणार असून अधिकाधिक महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या महिला रुग्णांवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे सवलतीच्या दरात उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी दिक्षा सुरे यांच्याशी ९६८९६८०९०१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button