भाजपा भडगाव महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर; योजना पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा

भाजपा भडगाव महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर; योजना पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मान्यतेने नवीन कार्यकारिणीची घोषणा; पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव
भडगाव (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम भडगाव मंडळ महिला मोर्चाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी योजना पाटील यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महिला जिल्हाध्यक्षा ॲड. कृतिका आफ्रे तसेच मंडळाध्यक्ष विनोद नेरकर यांच्या मान्यतेने ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी गायत्री बिरारी, सुनिता शिंपी, शिला पाटील, सुनिता चौधरी, सोनाली चौधरी, मोनाली बागल आणि नसीम बानो पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी चंदा पाटील, रंजना परदेशी, मनिषा पाटील आणि सुनिता माळी यांची निवड करण्यात आली असून चिटणीसपदी भावना राजपूत, हेमलता शिंपी, ज्योती पाटील, शारदा पाटील, मिनाक्षी पाटील, सुनिता पाटील आणि निता भंडारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहराध्यक्षपदी योगिता वाघ, कोषाध्यक्षपदी मनिषा पाटील, प्रसिद्धी प्रमुखपदी मिनाक्षी पाटील तर सोशल मीडिया प्रमुखपदी रूपाली पाटील यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय विविध पदांवर अनेक कार्यकर्त्यांना संधी देत विस्तृत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या निवडीबद्दल आमदार दिलीप वाघ, महिला नेत्या वैशाली सूर्यवंशी, युवानेते अमोल शिंदे, किसान संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, पीटीसी चेअरमन संजय वाघ यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.






