FarmingPolitics

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, भडगाव गिरणा नदी पात्रातील अवैध वाळू उपसा थांबवा

भाजप किसान मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, भडगाव गिरणा नदी पात्रातील अवैध वाळू उपसा थांबवा

भाजप किसान मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

भडगाव (प्रतिनिधी) भडगाव तालुक्यातील व जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन भाजप किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना देण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास मोरे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ पाटील, जिजाबराव पाटील, रत्नाकर पाटील, बापुराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.या निवेदनात भडगाव गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे भूजल पातळी खालावण्याचा धोका निर्माण झाला आहे.

यामुळे भविष्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून वाळूमाफियांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, भडगाव व जळगाव तालुक्यांत वाढलेल्या शेतकऱ्यांची तार व केबल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी चोरट्यांचा बंदोबस्त करावा. भडगावसह जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढल्याने पशुधनाचे नुकसान होत असून, संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तातडीने द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

तसेच प्रलंबित पीक विम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, शासकीय ज्वारी खरेदी केंद्रांना मुदतवाढ देऊन शिल्लक ज्वारीची खरेदी पूर्ण करावी, तसेच रब्बी हंगामासाठी वाघूर व गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

याशिवाय, २०२३ पासून वारसाहक्काने किंवा खरेदीद्वारे जमीन मिळविलेल्या अनेक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व मुख्यमंत्री किसान योजनेचा लाभ मिळत नसून, फार्मर आयडी काढण्यातही अडचणी येत आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली यासोबतच ई-पीक पाहणीमध्ये तलाठ्यांकडून पीक पेरा मंजूर होऊनही पोर्टलवर मंजुरी दिसत नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच पीक पेरा नोंदविताना लॉगिन प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात. कृषी विभागात केवळ ५८ टक्के कर्मचारी कार्यरत असून, ४२ टक्के पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांची कामे रखडत आहेत. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.

‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेतील सौर पॅनेल नैसर्गिक आपत्तीमुळे खराब झाल्यास पाच वर्षांची कंपनी गॅरंटी असतानाही दुरुस्ती किंवा बदलून देण्यास कंपन्यांकडून टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारींची दखल घ्यावी. तसेच राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) अंतर्गत पशुपालन व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज मंजूर करताना लावण्यात येणाऱ्या जाचक अटी शिथिल कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष कमलाकर रोटे, मनोहर पाटील, सच्चिदानंद चव्हाण, किशोर नारखेडे, घनश्याम पाटील, किसन पाटील, जिल्हा चिटणीस अरुण पाटील, कुंदनसिंग पाटील, संजय पाटील, भगवान पाटील, पारोळा तालुकाध्यक्ष भरत पाटील, कैलास पाटील, प्रमोद पाटील यांच्यासह किसान मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button