Crime

पांढरी शिवारातील अवैध हातभट्टीवर अडावद पोलिसांचा छापा; दीड लाखांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट

२ हजार लिटर रसायन, ४० लिटर तयार गावठी दारू आणि भट्टीचे साहित्य नष्ट; एकाविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा

पांढरी शिवारातील अवैध हातभट्टीवर अडावद पोलिसांचा  छापा; दीड लाखांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट

२ हजार लिटर रसायन, ४० लिटर तयार गावठी दारू आणि भट्टीचे साहित्य नष्ट; एकाविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा

जळगाव | प्रतिनिधी

अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढरी शिवारात नाल्याच्या काठी सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल १ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पंचांसमक्ष जागेवरच नष्ट केला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.

गोपनीय माहितीवरून छापा

अवैध हातभट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली किरण रमेश शिरसाठ, सचिन नागरे, जितेंद्र सोनवणे, शेषराव तोरे, भरत नाईक, भूषण राजेंद्र चव्हाण आणि प्रदीप पाटील यांच्या पथकाने पांढरी शिवारातील नाल्याच्या काठी छापा टाकला. कारवाईदरम्यान तेथे मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले.

मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

छाप्यात २ हजार लिटर गूळ-नवसागर मिश्रित कच्चे व पक्के रसायन भरलेले १२ प्लास्टिकचे ड्रम, लोखंडी पत्र्याची टाकी, लाकडी चूल, भट्टीसाठी लागणारे साहित्य तसेच ४० लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू असा एकूण १ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संपूर्ण मुद्देमाल पंचांच्या उपस्थितीत जागेवरच नष्ट करण्यात आला.

एकाविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी कैलास काशिनाथ कोळी (वय ३३, रा. इंदिरानगर प्लॉट, अडावद, ता. चोपडा) याच्याविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद किरण रमेश शिरसाठ यांनी दिली असून, पुढील तपास अडावद पोलीस करीत आहेत.

अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई सुरूच

जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button