यवतमाळ बसस्थानक चोरी प्रकरणात दोन सराईत चोरांना अटक ; एक लाख वीस हजारांची रोकड जप्त

यवतमाळ बसस्थानक चोरी प्रकरणात दोन सराईत चोरांना अटक ; एक लाख वीस हजारांची रोकड जप्त
यवतमाळ (प्रतिनिधी) – यवतमाळ शहरातील तसेच जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवर होणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमरावती येथील दोन सराईत पाकीटमारांना अटक केली आहे. या कारवाईत त्यांच्याकडून ₹1,20,000/- ची रोकड जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमद बेग कादर बेग (वय ६०, रा. मुजफ्फरपुरा, नागपूरी गेट, अमरावती) आणि सलीम शाहा सबरअली शाहा (वय ५२, रा. अलमास नगर, जुनी वस्ती, बडनेरा, अमरावती) हे दोघे सराईत चोर असून, मागील काही महिन्यांपासून यवतमाळ जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवर चोरी करीत होते. मुखबिरांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
चौकशीत या दोघांनी यवतमाळ जिल्ह्यातील पुढील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या चोरीच्या सहा गुन्ह्यांची कबुली दिली.
या गुन्ह्यांमध्ये त्यांनी चोरलेली ,20,000/- ची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपासासाठी त्यांना पो.स्टे. अवधुतवाडीच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आणि पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि. गजानन राजमल्लू व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या पथकात अंमलदार सफी सैयद साजिद, पोहवा रूपेश पाली, प्रशांत हेडाऊ, योगेश डगवार, पोशि आकाश सूर्यवंशी आणि देवेंद्र होले यांचा सहभाग होता.
यशस्वी कारवाईमुळे यवतमाळ जिल्ह्यातील चोऱ्यांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.