एरंडोल येथे वंचित बहुजन आघाडीच्या पक्षप्रवेश मेळाव्यात राष्ट्रवादी व एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने प्रवेश

एरंडोल येथे वंचित बहुजन आघाडीच्या पक्षप्रवेश मेळाव्यात राष्ट्रवादी व एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने प्रवेश
एरंडोल प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीच्या एरंडोल तालुका शाखेत आज झालेल्या भव्य पक्षप्रवेश मेळाव्यात विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने प्रवेश करून नवा राजकीय उत्साह निर्माण केला. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे किसान सेल तालुका अध्यक्ष राजेंद्र चौधरी तसेच एमआयएमचे तालुकाध्यक्ष व अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला.
या पक्षप्रवेशानंतर वंचित बहुजन आघाडीचे जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष दादासाहेब ईश्वर पाटील (लाला सर), जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब हरिश्चंद्र सोनवणे व जिल्हा सचिव प्रीतीलाल पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्षाच्या धोरणांची सविस्तर माहिती दिली. तसेच नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना पदभार व नियुक्तीपत्र देण्यात आले.
या वेळी एरंडोल तालुक्यातील नव्याने नियुक्त करण्यात आलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत : तालुका अध्यक्ष म्हणून राजेंद्र भाऊ चौधरी, उपजिल्हा प्रमुख दीपक लक्ष्मण पाटील (मालखेडा), अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सत्तार खान अकबर खान, उपतालुका अध्यक्ष (अल्पसंख्याक) शेख कलीम शेख सलीम, उपतालुका अध्यक्ष बबन वेळू वंजारी, तालुका संघटक मुकुंद भाऊ ठाकूर (विखरण), तालुका उपाध्यक्ष अभयसिंग सोनू पवार (खेडगाव तांडा), कासोदा शहर प्रमुख ज्ञानेश्वर जुलाल पाटील, युवा अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष अलाउद्दीन जैनुद्दीन शेख, युवा अल्पसंख्याक आघाडी शहराध्यक्ष कामील हमीद मुजावर, तसेच आसन खान शकील खान (वार्ड क्र. ११), शेख नुरा सय्यद, परविन पाटील (जवखेडा), विशाल महाजन (निपाणी) आणि दादासाहेब अंबादास लोहार (एरंडोल) यांचा समावेश आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे एरंडोल तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली असून, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.






