Crime

मोटारसायकल चोरीच्या ३ गुन्ह्यांची उकल; ५ लाख ६ हजारांच्या ११ मोटारसायकली हस्तगत

मोटारसायकल चोरीच्या ३ गुन्ह्यांची उकल; ५ लाख ६ हजारांच्या ११ मोटारसायकली हस्तगत

नंदुरबार (प्रतिनिधी) : नंदुरबार जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या तीन गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, दोन संशयितांकडून तब्बल ५ लाख ६ हजार रुपये किमतीच्या ११ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार तळोदा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील न उघड गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असताना ३१ ऑगस्ट २०२६ रोजी दिपक हिरालाल पावरा (वय २१, रा. मोयदा, ता. शिरपूर, जि. धुळे) आणि बाळा वसा पावरा (वय २१, रा. तेलखेडी-आठरीपाडा, ता. धडगाव, जि. नंदुरबार) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून एकूण ११ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. तपासात शहादा पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ५५५/२०२५ व गु.र.नं. १३१/२०२५ तसेच नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ४१०/२०२६ असे मोटारसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

हस्तगत करण्यात आलेल्या उर्वरित मोटारसायकलींबाबत गुन्हे दाखल आहेत किंवा नाहीत, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप व अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, महेश निकम, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार सजन वाघ, स्वप्नील गोसावी, दादाभाऊ वाघ, योगेंद्र सोनार, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे आणि पोलीस अंमलदार यशोदिप ओगले यांच्या पथकाने केली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button