Crime

सराईत गुन्हेगार तन्वीर ऊर्फ तन्या एमपीडीएअंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची धडक कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सराईत गुन्हेगार तन्वीर ऊर्फ तन्या एमपीडीएअंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची धडक कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव प्रतिनिधी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाया अधिक तीव्र केल्या आहेत. या अंतर्गत जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार तन्वीर ऊर्फ तन्या रहीम शेख (वय २१, रा. नुरानी मशीदजवळ, गेंदालाल मिल, जळगाव) याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ (MPDA) अधिनियमांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करून त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

तन्वीर ऊर्फ तन्या याच्यावर जळगाव शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरी, सरकारी नोकरावर हल्ला, दुखापत करणे, दंगा, घरफोडी आणि आर्म्स ॲक्ट यांसारखे ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०२२ ते २०२६ या काळात त्याच्यावर हद्दपारीसह विविध प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी ११ ऑगस्ट २०२६ रोजी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी १४ ऑगस्ट २०२६ रोजी आदेश जारी करून (आदेश क्र. दंडप्र/कावि/एमपीडीए/०४/२०२६) त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार, १४ ऑगस्ट रोजीच पोलीस पथकाने तन्वीर शेख याला ताब्यात घेऊन येरवडा मध्यवर्ती कारागृहात दाखल केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक सागर शिंपी आणि सपोनि सुरेश आव्हाड व पथकाने केली. सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button