सुरक्षित अन्न – निरोगी महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत धुळे जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळेची तपासणी व नमुना संकलन


सुरक्षित अन्न – निरोगी महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत धुळे जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळेची तपासणी व नमुना संकलन
धुळे, दि. 24 सप्टेंबर 2026 : सुरक्षित अन्न – निरोगी महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत मा. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या अनुषंगाने विविध शाळेची तपासणी करण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत सरस्वती कन्या विद्यालय फागणे व सी एस बाफना हायस्कूल फागणे व श्रीमती रुक्मिणी देवी प्राथमिक विद्यालय फागणे येथे तपासणी करून मसाले पदार्थ, खाद्यतेल, तांदूळ व विद्यार्थ्यांना शाळेत देण्यात येणारा पोषण आहार इत्यादी अन्नपदार्थांचे एकूण 7 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले.
संकलित केलेले सर्व अन्नपदार्थांचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात येणार असून, प्राप्त होणाऱ्या विश्लेषण अहवालानुसार पुढील नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
सदर कारवाई सह आयुक्त (अन्न), नाशिक श्री. मंगेश माने व सहायक आयुक्त (अन्न), धुळे श्री. गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. शशिकांत राणे, अन्न सुरक्षा अधिकारी, अरविंद राऊत व मंगेश भावसार यांनी केली.
विद्यार्थ्यांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण व भेसळमुक्त अन्न उपलब्ध करून देण्यासाठी अन्न सुरक्षा विभागामार्फत अशा प्रकारच्या तपासण्या व नमुना संकलनाची कार्यवाही सातत्याने सुरू राहणार आहे.







