PoliticsSocial

अमळनेरमध्ये युवासेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोग्यासाठी विशेष पूजा व महाआरती

अमळनेरमध्ये युवासेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोग्यासाठी विशेष पूजा व महाआरती

अमळनेर प्रतिनिधी: शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव संभाजीराव शिंदे साहेब यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि लवकर प्रकृती सुधारावी, या सद्भावनेने अमळनेर युवासेनेच्या वतीने अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात विशेष पूजा व महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिंदे साहेबांच्या निरोगी, दीर्घायुषी आणि निरंतर जनसेवेसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

हा कार्यक्रम जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली, अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना लोकसभा संपर्कप्रमुख निखिलजी चौधरी, युवासेना जिल्हाप्रमुख रोहितजी कोगटा आणि शिवसेना तालुकाप्रमुख गुलाब बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

या प्रसंगी अमळनेर युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण पुरुषोत्तम पाटील, तालुकाप्रमुख राहुल भास्कर कंजर युवासेना उपतालुकाप्रमुख राहुल साहेबराव पाटील, युवासेना उपशहरप्रमुख सनी चव्हाण, युवासेना शहर संघटक पंकज अरुण चौधरी, युवासेना उपशहर संघटक यश मोहन साळुंखे तसेच युवासैनिक मनीष हरिश्चंद्र चौधरी, अमन खाटीक, सचिन विलास पाटील, अजय कुंदन पवार, प्रदीप किरण देशमुख, कुणाल ज्ञानेश्वर शिरसाट यांनी या उपक्रमाचे नियोजन व आयोजन यशस्वीरीत्या पार पाडले.

कार्यक्रमास धर्मवीर अध्यात्मिक सेना समन्वयक तथा मंगळ ग्रह सेवाभावी संस्था सदस्य दिलीप आत्माराम बहिरम,सर शिवसेना शहरप्रमुख विलास सुखदेव कंखरे तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख प्रमोद शिंपी यांनी विशेष उपस्थिती दर्शविली.

यावेळी युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक तसेच मंगळ ग्रह सेवाभावी संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी एकनाथ शिंदे साहेब लवकरात लवकर पूर्णपणे निरोगी होऊन पूर्वीप्रमाणे नव्या जोमाने महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेत कार्यरत व्हावेत, अशी ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना केली.

संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय आणि सकारात्मक वातावरणात पार पडला. उपस्थितांनी एकमुखाने शिंदे साहेबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड जनसेवेची शक्ती लाभावी, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button