Crime

ब्रेकिंग : पाळधीत कर्फ्यू, दंगलीत पाऊण कोटींचे नुकसान, २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात वाहनाचा कट लागल्यावरून जातीय दंगल झाली त्यानंतर दुकाने आणि वाहनांची जाळपोळ केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली होती. दंगलीत ११ दुकानांसह ४ चारचाकी वाहने जळून अंदाजे ६३ लाख २८ हजार रुपयांचे नुकसान केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अज्ञात २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी गावात मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास वाहनाचा कट लागल्यावरून वाद निर्माण झाला होता. या वादातून गावातील २० ते २५ जणांच्या अज्ञात जमावाने दगडफेक करून रस्त्यावरील बंद असलेले दुकानांना आणि रस्त्यावरील ४ वाहनांना पेटवून दिल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

जाळपोळ आणि दगडफेकीत अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात यासीर अमित देशमुख यांचे मोबाईल दुकानात दीड लाखांचे मोबाईल चोरून नेले, जावेद पथरू पिंजारी यांचे चप्पल दुकानाला आग लावून ८ लाखांचे नुकसान झाले, शेख हबीब शेख शरीफ यांचे पानसेंटरला आग लावून २ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान केले, वकार अहमद शेख शकील यांच्या घरासमोरील दोन दुचाकी आणि घरांवर दगडफेक करून ५ हजार रुपयांचे नुकसान केले.

फारुक शेख शरीफ यांचे बाजार पट्ट्यातील इलेक्ट्रिक दुकानाला आग लावून अंदाजे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एजाज युसूफ देशमुख यांच्या मक्का शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील ऑटो पार्ट्स दुकान फोडून ३ लाख रुपयांचे सामान चोरून नेला. दानिश शेख सत्तार यांच्या रेफ्रिजरेटर दुकान फोडून सामानांची तोडफोड करत १० लाखांचे नुकसान केले. शेख साबीर शेख सादिक यांच्या मोबाईल शॉप दुकानाचे शटर तोडून नवीन मोबाईल व एलसीडी यांची तोडफोड करून २ लाखांचे नुकसान झाले. अक्रम खान अन्वर खान यांचे दुकान फोडून ४० हजार रुपये किमतीचे अंड्यांचे नुकसान केले.

रफिक खान अन्वर खान यांच्या आमलेट सेंटर हातगाडीचे नुकसान करत ३ हजार रुपयांचे नुकसान केले. आणि राष्ट्रीय महामार्गाच्या बोगद्याजवळ शेख तसव्वर शेख हमीद यांचे मालकीचे सॅन्ट्रो, टाटा, झेनॉन पोलो आणि मालवाहतूक पिकअप वाहन अशी ४ वाहने भेटून सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान केले. सर्वमिळून अंदाजे ६३ लाख २८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी जावेद पथरू पिंजारी वय ४० रा. बागवान मोहल्ला, पाळधी ता.धरणगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाळधी पोलीस ठाण्यात अनोळखी २० ते २५ जणांविरोधात दंगलीसह तोडफोड आणि आग लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले हे करीत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button