Crime

जळगावातील अग्रवाल वेफर्स कंपनीत आग; बॉयलर आणि ऑईल जळल्याने लाखो रुपयांचे नुकसान

जळगावातील अग्रवाल वेफर्स कंपनीत आग; बॉयलर आणि ऑईल जळल्याने लाखो रुपयांचे नुकसान


​जळगाव: शहरातील गुरांच्या बाजाराजवळील सेक्टर एन-५ मधील अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीज या कारखान्याला मंगळवारी सायंकाळी अचानक आग लागली.

 

या आगीत कारखान्यातील बॉयलर, खाद्यतेलाचे पिंप, पॅकिंगचे पुठ्ठे, इलेक्ट्रॉनिक पंखे यांसह रूममधील महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

​कारखान्याचे मालक जितेंद्र अग्रवाल यांनी तात्काळ मनपा अग्निशमन दलाला कॉल केला. मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या आदेशाने अधिकारी भारत बारी आणि जवानांचे पथक बंबांसह घटनास्थळी दाखल झाले. कारखान्यात ज्वलनशील साहित्य असल्याने आग पसरत होती, मात्र जवानांनी पाण्याचा मारा करत आग इतर विभागात पसरण्याआधीच रोखली. चालक देविदास सुरवाडे, संजय भोईटे, दीपक चौधरी यांच्यासह फायरमन रोहिदास चौधरी, सुमित साळवे, नवाल शंकरपाळ, दीपक रोंदडे, जगदीश साळुंखे व संदीप कोळी यांनी ही कामगिरी फत्ते केली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button