Education

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्दीतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्दीतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

नासाकडून सायबर सुरक्षा संशोधनासाठी यतीश भारंबेचा गौरव, असुरक्षितता प्रकटीकरण कार्यक्रम अंतर्गत अधिकृत प्रशंसापत्र
जळगाव : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी यतीश भारंबे याने सायबर सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधनाच्या जोरावर जगातील अग्रगण्य अंतराळ संशोधन संस्था नासाकडून अधिकृत गौरव मिळवून महाविद्यालयासह जळगाव जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे. नासाच्या असुरक्षीतता प्रकटीकरण अंतर्गत त्यांच्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेत अधिकृत प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले आहे.

यतीश यांनी नासाच्या माहिती सुरक्षा प्रणालीतील संभाव्य सुरक्षात्रुटी शोधून ती जबाबदारीने संस्थेकडे नोंदविली. त्यांच्या या संशोधनामुळे नासाच्या माहिती प्रणालीची सुरक्षितता अधिक बळकट करण्यास मदत झाल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. नासाचे एसआयएसओ वरिष्ठ एजन्सी माहिती सुरक्षा अधिकारी माईक विट यांनी पाठविलेल्या प्रशंसापत्रात यतीश यांच्या स्वतंत्र सुरक्षा संशोधक म्हणून केलेल्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षा ही जागतिक सुरक्षेचा महत्त्वाचा आधारस्तंभ बनली आहे. अशा क्षेत्रात एका भारतीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याला थेट नासाकडून अधिकृत मान्यता मिळणे ही केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून भारतीय विद्यार्थ्यांच्या संशोधन क्षमतेची जागतिक स्तरावर झालेली दखल आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी यतीश यांचे अभिनंदन करताना सांगितले की, हे यश गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. संशोधन, नवोपक्रम, सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या आधुनिक क्षेत्रांत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे आमचे प्रयत्न भविष्यातही सुरू राहतील.या उल्लेखनीय यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील व विभागप्रमुख प्रा. निलेश वाणी यांनी यतीश यांचे अभिनंदन केले. सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.यतीश भारंबे यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांचे आशीर्वाद, शिक्षकांचे मार्गदर्शन, महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण आणि सातत्यपूर्ण स्व-अभ्यासाला दिले. भविष्यात सायबर सुरक्षा क्षेत्रात अधिक संशोधन करून भारताचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.या यशामुळे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन संस्कृती आणि विद्यार्थ्यांच्या जागतिक क्षमतेची पुन्हा एकदा प्रभावीपणे प्रचिती आली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button