PoliticsSocial

नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमी निमित्त पारंपारिक शस्त्र पूजन व ध्वज पूजन सोहळा उत्साहात

नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमी निमित्त पारंपारिक शस्त्र पूजन व ध्वज पूजन सोहळा उत्साहात

जळगाव : श्री नेहरू चौक मित्र मंडळातर्फे मंगळवारी (दि. २०) विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्रपूजन व ध्वजपूजन सोहळा उत्साहात आणि विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

शस्त्रपूजन परंपरेचे मंडळाचे हे यंदाचे ४३ वे वर्षे होते. सुरुवातीला ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात मान्यवरांच्या हस्ते विधिवत शस्त्रपूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी ध्वजस्तंभाचे पूजन करून उपस्थितांना व परस्परांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. विजयादशमीनिमित्त ही ऐतिहासिक परंपरा सातत्याने जोपासण्याचे कौतुकास्पद काम केल्याबद्दल सर्वच मान्यवरांनी श्री नेहरू चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांचे विशेष आभार मानले व कौतुक केले.

या सोहळ्यास खा. स्मिताताई वाघ, आ. राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी मोघे, भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, भाजपचे महापालिकेतील गटनेते प्रकाश बालाणी, नगरसेवक सागर सोनवणे, जळगाव पीपल्स बँकेचे माजी चेअरमन भालचंद्र पाटील, केशव स्मृती समूहाचे अध्यक्ष भरत अमळकर, ॲड. विपिन पाटील, दिलीप गांधी, शैलेश ठाकरे, संदीप रडे, अतुल हाडा आणि नेहरू चौक मित्

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button